भंडारदरा : वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरने चिचोंडी येथे एका दुचाकीला उडविले. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भंडारदऱ्याच्या रिंगरोडला सिमेंटी करणाचे काम सध्या सुरु असून त्या ठिकाणाहुन वाळू खाली केल्यानंतर परत माघारी फिरत असताना चिचोंडीजवळ (एम.एच. १५ जे.क्यु. ४५५५) क्रमांकाच्या रिकाम्या डंपरने एका दुचाकीवरील दोघांना जोराची धडक दिली.
या धडकेमध्ये चिचोंडी येथील संतोष किसन मध्ये हा युवक जागीच मयत झाला असून सचिन तुकाराम मध्ये हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका मोठा होता की, मयत झालेला संतोष हा काही काळ गाडीच्या टायर खाली पडून होता. असदर अपघात झाल्यानंतर डंपरचा चालक हा पळून गेला असून डंपर राजूर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.