Wednesday, September 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नाशिकमध्ये DRI चा मोठा मास्टरस्ट्रोक! पाकिस्तानच्या आयातीवरील बंदी हुलकावून आणलेले १३ कंटेनर जप्त

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 15 September 2026, 18:12

नाशिक : पाकिस्तानमध्ये उत्पादित किंवा तेथून निर्यात होणाऱ्या वस्तूंच्या भारतातील आयातीवर केंद्र सरकारने बंदी घातली असतानाही तिसऱ्या देशामार्गे पाकिस्तानी माल भारतात आणण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) ‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’ अंतर्गत नाशिकमध्ये कारवाई करत सुक्या खजुराने भरलेले १३ कंटेनर अडवले आहेत. या कंटेनरमध्ये ३६२ मेट्रिक टनांहून अधिक सुका खजूर असल्याचे तपासात समोर आले आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीनंतर DRIच्या अधिकाऱ्यांनी नाशिकमधील अंबड येथील कंटेनर फ्रेट स्टेशनवर (CFS) ही कारवाई केली. मुंबईतील एका कंपनीने आयात केलेल्या सुक्या खजुराचे हे कंटेनर तपासणीसाठी थांबवण्यात आले. तपासणीदरम्यान या मालाचे मूळ पाकिस्तान असल्याचे आढळून आल्याचे DRIकडून सांगण्यात आले आहे.

अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, हा माल पाकिस्तानातील कराची बंदरातून जहाजाद्वारे संयुक्त अरब अमिरातीतील जेबेल अली बंदरात पाठवण्यात आला होता. त्यानंतर हा माल दुसऱ्या कंटेनरमध्ये भरण्यात आल्याचा प्राथमिक तपासात निष्कर्ष आहे. भारतात आयात करताना कागदपत्रांमध्ये मात्र या मालाचा उगम संयुक्त अरब अमिराती असल्याचे दाखवण्यात आल्याचा संशय आहे.

पाकिस्तानमधील माल असल्याची बाब लपवून तिसऱ्या देशातून आयात केल्याचे भासवण्यासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा तपास यंत्रणांचा संशय आहे. पाकिस्तानी नागरिकांकडून चालवल्या जाणाऱ्या काही कंपन्यांच्या माध्यमातून हा माल भारतात पाठवण्यात आला असण्याची शक्यताही तपासली जात आहे.

 

पाकिस्तानमधून भारतात वस्तूंची आयात करण्यावर बंदी असताना त्याचा मार्ग चुकवून माल भारतात आणण्याचा प्रयत्न झाल्याने या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे. या प्रकरणातून मालाचा मूळ देश लपवून तो दुसऱ्या देशातून आयात झाल्याचे दाखवण्याच्या पद्धतीचा तपास यंत्रणांकडून केला जात आहे.

DRI आणि कस्टम विभागाकडून या प्रकरणातील इतर संबंधित व्यक्ती, कंपन्या आणि व्यवहारांचा तपास सुरू असून, या कथित रॅकेटमधील आणखी कोणते दुवे आहेत, याचा शोध घेतला जात आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“मला उशीर करू नका, माझ्यासाठी आरक्षण महत्त्वाचे”; प्रकृती खालावली तरीही जरांगे मुंबई गाठण्यावर ठाम

Wednesday, 16 September 2026, 20:21

बारामतीत सोमेश्वर कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सुरू; इच्छुकांच्या मुलाखतींना वेग

Wednesday, 16 September 2026, 19:38

गणेशोत्सवात एफडीएची धडक कारवाई; नामांकित हॉटेल्सचे परवाने रद्द, कोटींचा गुटखा जप्त

Wednesday, 16 September 2026, 18:53

“5 ऑक्टोबरपासून दुष्काळी स्थितीचे तातडीने पंचनामे सुरू होणार” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे करणार दुष्काळी भागांची पाहणी

Wednesday, 16 September 2026, 18:37

दिशा सालियान प्रकरण पुन्हा चर्चेत; आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण, म्हणाले ‘मी कधीही…’

Wednesday, 16 September 2026, 18:37

पुण्यात डीजे चालकांवर पोलिसांचा मोठा बडगा; १४ लाखांचा ट्रक आणि साऊंड सिस्टिम जप्त

Wednesday, 16 September 2026, 18:07
Next Post

'डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी जिल्हा बँकेची निवडणूक लढवावी'; 33 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठराव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp