PM Modi Nashik Speech : नाशिक: काळाराम मंदिरात पंतप्रधानांनी पूजन झाल्यावर हाती झाडू घेत स्वच्छता केली. तसेच युवकांना स्थानिक उत्पादने वापरण्याचा सल्ला दिला. मद्यपानापासून दूर राहा, ड्रग्जच्या आहारी जाऊ नका आणि आई-बहिणींवरून अपशब्द वापरणे बंद करा, असा सल्ला मोदींनी तरूणांना दिला आहे.
भारत टॉप 5 अर्थव्यवस्था
जगातील टॉप पाच अर्थव्यवस्थेमध्ये आज भारताची गणना होते. आज भारत एकापेक्षा जास्त इनोवेशन करत आहे. भारत अनेक पेटंट फाईल करत आहे. भारत आज मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे, त्याचा आधार हा युवक आहे. ही भारताच्या युवकांची ताकद आहे, असे मोदी म्हणाले.
जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले
महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले.अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर यांना घडवले आहे. मला महाराष्ट्राच्या वीरभूमीत येण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद आहे. मी नारीशक्तीला कोटी कोटी वंदन करतो. स्वामी विवेकानंद जयंतीच्या दिवशी युवकांसोबत नाशिकमध्ये आहे हे माझे सौभाग्य आहे.
प्रभू रामाच्या पदस्पर्शाने नाशिकची भूमी पावन
14 जानेवारी मकर संक्रांतीपासून 22 जानेवारीतील सर्व तीर्थक्षेत्रावर स्वच्छता मोहीम राबवावी असे पंतप्रधान मोदी म्हणाले. प्रभू राम पंचवटीत वास्तव्यास होते. त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. काळाराम मंदिरात येण्याची आणि स्वच्छता करण्याची मला संधी मिळाली हे माझे भाग्य आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
अहिल्यादेवी होळकर, लोकमान्य टिळक, वीर सावरकर
महाराष्ट्र ही वीरभूमी आहे. राजामाता जिजाऊसारख्या वीरमातेने न छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजाला जन्म दिला. याच धर्तीने देवी अहिल्यादेवी होळकर, रमाबाई आंबेडकरसारख्या महान नारीशक्ती देशाला दिली. याच धर्तीने लोकमान्य टिळक, वीर सावरकर, दादासाहेब पोतनीस, चाफेकर बंधू, आनंद कन्हेरे असे वीर दिले.
परिवारवाद संपवायला तरुणांनी सक्रिय राजकारणात यावं
देशाची युवा पिढी तयार होत आहे. परिवारवादाच्या राजकारणाने देशाचं नुकसान केलंय. युवक आपल्या लोकशाहीत उर्जा आणू शकतील. युवकांनी मतदारयादीत नाव आल्यानंतर देशासाठी मतदान करावं. गुलामी आणि तणावापासून मुक्त राहण्यासाठी तरूणांची गरज आहे. सरकारने अनेक योजना राबवून देशाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवला आहे.
आदित्य एल 1 चे यश जगासोमर
आमच्या सरकारने 10 वर्षात युवकांना व्यासपीठ देण्याचे प्रयत्न केला. योजनांच्या माध्यमातून युवकांना जोडण्याचा प्रयत्न केला. आम्ही तीनपट काम आहे. युवकांसाठी नवी संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. नवे शैक्षणिक धोरण लागू केले आहे. भारातातील विमानतळे ही जगातील मोठ्या विमानतळइतरकी सक्षम आहेत. चांद्रयान आदित्य एल 1 चे यश जगासोमर आहे. युवकांना त्यांची स्वप्न मोठी करण्याचा काळ आहे. महासत्ता म्हणून भारत नावारुपास येत आहे. त्यामुळे पुढील 25 वर्ष तुमच्यासाठी कर्तव्यकाळ आहे.