नाशिक : भाविकांसाठी नवरात्रोत्सवासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. नवरात्रोत्सवा काळामध्ये साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भक्तगण वणी येथे येत असतात. याच पार्श्वभूमीवर सप्तश्रृंगी देवीच्या भाविकांसाठी एक बातमी समोर आली आहे. नवरात्रोत्सवामध्ये गडावर भाविकांची मोठी संख्या उपस्थित असते. एकाचवेळी अनेक भाविक गडावर जमत असतात. त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी या नऊ दिवसांमध्ये असते. यंदा नवरात्रौत्सव काळात सप्तशृंगी देवीचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार आहे. ०३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार आहे. नवरात्रौत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
भाविकांसाठी मंदिर २४ तास खुलं राहणार..
गडावर देवीच्या मंदिरात जाणारी फनिक्युलर ट्रॉली सुद्धा २४ तास कार्यान्वित राहणार आहे. मंदिर गाभाऱ्यात फनिक्युलर ट्रॉलीने येणाऱ्या भाविकांना ३० टक्के तर पायरीने येणाऱ्या भाविकांना ७० टक्के प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, नवरात्रौत्सव काळात नांदुरी ते सप्तशृंगी गडादरम्यान खासगी वाहतूक देखील बंद राहणार आहे. १०० एसटी बसेसच्या माध्यमातून नांदुरी ते सप्तशृंगी गड भाविकांची वाहतूक करण्याचं नियोजन असणारा आहे.
भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी निर्णय..
गर्दीचं नियोजन आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागील वर्षी सप्तशृंगगड परिसरामध्ये भाविकांची कुठल्याही पद्धतीने गैरसोय होवू नये, या अनुषंगाने उदभोदन कक्षाची स्थापना करण्यात आली होती. यंदा देखील नवरात्रीच्या नऊ दिवसात मंदिर सुरू राहणार आहे. शासकीय अधिकारी, सप्तशृंग निवासिनी ट्रस्ट विश्वस्त, व्यवस्थापक ग्रामपंचायत यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.