राहुरी : दुकान व घर घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहित महिलेचा सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या घटनेबाबत सासरच्या पाच लोकांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रतिक्षा अभिजित चव्हाण (रा. लिमटेक, ता. बारामती, जि. पुणे. हल्ली रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) या विवाहित तरुणीने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्याद दिली आहे. प्रतिक्षा चव्हाण हिचा विवाह अभिजित भारत चव्हाण (रा. लिमटेक, ता. बारामती) याच्या सोबत 2019 रोजी झाला होता. लग्न झाल्यानंतर प्रतीक्षा हिला व्यवस्थित नांदविले. त्यानंतर काहीना काही कारणावरुन छळ करुन मारहाण करु लागले.
तसेच दुकान व घर घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावेत. यासाठी तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शारीरीक व मानसीक छळ करु लागले. सासरच्या लोकांच्या जाचास कंटाळून या तरुणीने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून आरोपी पती अभिजित भारत चव्हाण, सासरा भारत सुभाना चव्हाण, दीर निलेश भारत चव्हाण, जाव ऋतुजा निलेश चव्हाण, नणंद अर्चना संदीप गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.