नाशिक: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढवल्या जातील, असे सांगत यासंदर्भातील अंतिम निर्णय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतील, असे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.
महाजन यांनी सोमवारी नाशिक शहरात उड्डाणपुलावर झालेल्या अपघातस्थळाची तस्थळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, निवडणुका स्वबळावर लढण्याची कार्यकत्यांसह पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. विधानसभा निवडणुकीत अन्य पक्षात जाऊन, तसेच पक्षाविरोधात काम व बंडखोरी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल. अन्य पक्षांतून भाजपमध्ये येण्यास इच्छुक असणाऱ्यांना प्रवेश देण्यापूर्वी आमदार व स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जाईल, असे आश्वासनही त्यांनी पक्षातील पदाधिकारी, तसेच निष्ठावान कार्यकर्त्यांना दिले.
बीड येथील खून प्रकरणात स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई होईल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. महाविकास आघाडीविषयी शिवसेनेकडून काँग्रेसवर होत असलेल्या टीकेविषयी महाजन म्हणाले की, महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने आता एकमेकांवर आरोप होत. असून, एका विशिष्ट कुटुंबाला वाचवण्यासाठी आघाडी करण्यात आल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
आठवडाभरात पालकमंत्र्यांची घोषणा
आठवडाभरात पालकमंत्री पदाबाबत निर्णय होईल, असे स्पष्ट करीत, महाजन यांनी कुंभमेळ्याच्या नियोजनाची जबाबदारी माझ्या खांद्यांवर असल्यामुळे कार्यवाहीच्या दृष्टीने पुढील आठवड्यापासून बैठका घेणार असल्याचे सांगितले.