हृदयद्रावक घटना…! शेततळ्यात बुडालेल्या नातवाला वाचविण्यासाठी गेलेल्या आजोबांचा आणि नातवाचा बुडून मृत्यू
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेततळ्याजवळ खेळत असलेला नातू पाय घसरून तळ्यात बुडाल्याने त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या आजोबांचा आणि नातवाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हि घटना २५ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. शिवाजी आत्याबा सोनवणे (वय- ६६), समर्थ नितीन सोनवणे (वय- ३) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तीची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनीसार, वेल्हाळे येथे पिंपळमळा भागात सोनवणे यांच्या घराजवळ त्याचं शेततळे आहे. त्याला सुरक्षेसाठी जाळी देखील बसविलेली आहे. सोनवणे यांनी शेततळ्याभोवती वाढलेले गवत काढण्यासाठी फवारणीचे औषध आणले होते. ते शेततळ्याचे गेट उघडून तळ्यात जवळील बाजूने फवारणी करण्यासाठी गेले.
दरम्यान , तळ्याचे गेट उघडे राहिल्यामुळे त्यांचा नातू समर्थ खेळता खेळता शेततळ्याकडे आला. त्याचा पाय घसरून तो तळ्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी शिवाजी सोनवणे यांनी उडी मारली. मात्र, आजोबाना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले.
या घटनेची माहिती मिळताच सोनवणे यांचा मुलगा नितीन यांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोघांनाही तळ्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी दोघांचाही मृत घोषित केले.