घोटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील गोंदे दुमाला येथील प्रभू ढाब्याजवळ सोमवारी (दि.६) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भरधाव चारचाकी वाहनाचे टायर फुटून अपघात झाला. या अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले. मुंबईकडून नाशिकच्या दिशेने येत असताना एमएच १५ डीएस १९५६ या क्रमांकाच्या कारचे टायर फुटल्याने अपघात होऊन कार उलटली. या अपघातात अमित ऐनापुरे (वय ४७, अनघा ऐनापुरे (वय ४३), अजय दत्तात्रय कुलकर्णी (वय ६३), अनिता कुलकर्णी (वय ५८ सर्व रा. नाशिक) जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी अपघातस्थळी दाखल होत सर्व जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.