नाशिक : गेल्या दोन दिवसांपूर्वी अंबड पोलीस ठाण्याच्या लगतच चार ते पाच घरफोड्या झाल्यानंतर सह्याद्रीनगर येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी कोयंडा तोडून सुमारे पाच लाख रुपये किंमतीचे सोने चांदीचे दागिने व रोख रकमेची चोरी उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, सह्याद्री येथील रहिवासी पल्लवी वानखेडे या गुरुवारी (दि. १८) रोजी त्यांच्या आईकडे इगतपुरी येथे गेल्या होत्या. त्या शुक्रवारी (दि १९) रोजी घरी परत आले, तर त्यांना घराचा कडी कोयंडा तुटलेला दिसला, घरात प्रवेश केला तर बेडरूम मधील कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, नेकलेस, कर्णवेल, अंगठी, चांदीचे पैंजण व पाच हजार रोख असा ४ लाख ९५ हजार रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पल्लवी वानखेडे यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे करीत आहेत.