नंदुरबार : शहादा शहरातील हमीद चौकात दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने दगडाने डोक्यावर मारुन दुखापत केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा येथील इकबाल खान गाजीदखान पठाण यांनी दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही. या कारणावरुन इकबाल खान गाजीदखान पठाण यांना अवेसखान हसनखान पठाण याने हात धरुन शाकीब खान इकबालखान पठाण याने दगडाने कानाचे मागे व पुढे तसेच डोक्यावर मारुन दुखापत केली. तसेच शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत इकबाल खान गाजीदखान पठाण यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. किरण पावरा करीत आहेत.