जळगाव : जळगावच्या कन्नड-चाळीसगाव बायपास हायवेवर आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे व कन्नड डेपोची बस समोरासमोर एकमेंकावर धाकल्या आहेत. या बसमधील तब्बल २५ ते २७ प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. परिसरातील नागरिकांनी या अपघातातील जखमींना तात्काळ चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या अपघातात धुळे व कन्नड डेपोच्या बसचे मोठे नुकसान झाले आहे. नेमका हा अपघात कसा झाला? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. अपघात झालेल्या दोन्ही बसमध्ये प्रवासी होते. यात एका बसच्या वाहकाकडील साईड दाबली गेल्याने त्या बसमधील प्रवाशी जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या अपघातात दोन्ही बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.