करमाळा : सोलापूर आणि पुणे या दोन जिल्ह्यांची जीवन वाहिनी म्हणजे भीमा नदीवरील डिकसळ पुल. या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत आणि पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचल्यामुळे या पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने अनेक प्रवाशांच्या गाड्या घसरून पडत आहेत.
डिकसळ पुलावरून प्रवास करणारे दुकान व्यावसायिक, मत्स्य व्यावसायिक, शेतकरी, विद्यार्थी हे करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातून भिगवणला ये-जा करत असतात. पुलावर पडलेल्या खड्ड्यांचा खड्ड्यांचा नाहक त्रास सर्व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. वाहनांचेही मोठ्या प्रमाणात यामुळे नुकसान होत आहे. रस्ते व बांधकाम विभाग यांनी तातडीने याकडे लक्ष घालून मोठी जीवित हानी होण्याअगोदरच पुलावरील खड्डे बुजवण्यात यावे. अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
पुलावरील खड्ड्यांमुळे रोज आम्हाला प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. माझ्यासारखे अनेक व्यवसायिक या पुलावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करतात.
अक्षय एकाड