पंढरपूर : पंढरपूरच्या शाळेतून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. विध्यार्थ्यांच्या पोषण आहारामध्ये बेडकाचे पिल्लू आढळले आहे. त्यामुळे पालकवर्गातून प्रचंड रोष आणि संताप व्यक्त केला जात आहे. लहान मुलांच्या जीवाशी शासनाचा खेळ सुरूच असल्याची टीका पालकांकडून केली जात आहे. पंढरपूरच्या कासेगाव येथील भुसे नगर येथील अंगणवाडीमध्ये हा प्रकार घडला आहे.
पोषण आहार वाटप करताना त्या आहारात बेडकाचे मृत पिल्लू सापडले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शालेय पोषण आहार हा आता विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला आहे की काय? अशी शंका या पोषण आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांच्या मानसिकता मधून दिसून येत आहे.