Camel Smuggling : धूळे : शिरपूर तालुक्यातील शिरपूर – चोपडा रस्त्यावरील गलंगी गावाच्या हद्दीत पुरेसे अन्नपाणी न देता उंटांची अवैधरीत्या क्रूर व निर्दयीतेने गुजरातमधील भूज, कच्छ येथून जाणारा ८५ उंटांचा जत्था अडवून सर्व उंट ताब्यात घेतले आहेत.
चोपडा ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी ८५ उंटांचा जत्था अडवून सर्व उंट ताब्यात घेतले आहेत. शिरपूर तालुक्यातील शिरपूर – चोपडा रस्त्यावरील गलंगी गावाच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुरेसे अन्नपाणी न देता उंटांना क्रूर व निर्दयीतेची वागणूक दिली जात होती. या ८५ उंटांची गो शाळेत रवानगी करण्यात आली आहे. हे उंट १६ लाख ३१ हजारांचे असून, त्यांची तस्करी आहे की खरेदी विक्रीतून त्यांचे स्थलांतर केले जात आहे, यासंदर्भात तपास सुरू आहे.
उंटांसदर्भातील शहरात ही पहिल्यांदाच कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोमाभाई मेधा रबारी (वय ५३, रा. लियारी, ता. अबडासा, जि. भूज, गुजरात), लाखाभाई देवाभाई रबारी (वय ५४, रा. बांड, ता. बुधरा, जि. भूज), वज्रभाई रबारी लालाभाई दबाय (वय ३७, रा. मोधारा, ता. हलिया, जि. भूज), बाधाभाई मेधाभाई रबारी (वय ४९, रा. लिधारी, ता. नलोया, जि. भूज) यांना ताब्यात घेतले आहे.