जळगाव: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. या निवडणुकीला डोळ्यांसमोर ठेवून नेतेमंडळी ‘आयाराम गयाराम’च्या भूमिकेत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शरद पवारांचे खंदे समर्थक जिवलग सहकारी, माजी विधानसभा अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते अरुण गुजराती (Arun Gujrati) यांनी शरद पवारांना सोडून अजित पवारांच्या सोबत जाण्याण्याचा निर्णय घेतला आहे. (Sharad Pawar and Arun Gujrati)

आज (मंगळवार 11 नोंनोव्हेंबर) संध्याकाळी अरुण गुजराती अधिकृतपणे अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
गेल्या 40 वर्षांपासून पवारांसोबत
अरुण गुजराती हे शरद पवार गेल्या चार दशकांपासूनचे निष्ठावंत सहकारी आहेत. गुजराती यांनी काँग्रेस पक्षापासून वेगळे झाल्यापासून शरद पवारांसोबत राजकारणाची सुरुवात केली. त्यानंतर राष्ट्रवादी कोन्ग्रेसच्या स्थापनेपासून ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले. गुजराती यांनी आज सकाळी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवारांची भेट घेतली होती. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पक्ष सोडण्याचा निर्णय घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज संध्याकाळी अरुण गुजराती अधिकृतपणे अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, अरुण गुजराती यांनी राज्यात मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष अशा विविध पदांवर काम केलं आहे. तसेच चोपडा विधानसभा मतदारसंघातून ते दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहिले आहेत.






