जळगाव: आगामी लोकसभा निवडणुकीआधीच जळगाव जिल्ह्यात शिवसेना-शिंदे गटात अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. जिल्हाप्रमुख विरुद्ध पदाधिकारी असे दोन गट निर्माण झाल्याने शिवसेना शिंदे गटात सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांच्याबाबत पक्ष नेतृत्वाकडे तक्रार केल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. जिल्हाप्रमुख निलेश पाटील पक्षात अस्वस्थ असल्याचीही जोरदार चर्चा रंगली आहे.