नगर : नगर महापालिकेची मुदत 27 डिसेंबर रोजी संपली. बुधवारी प्रशासकीय अधिकाऱ्याचा कार्यकाळ संपला. या पार्श्वभूमीवर आता राज्य निवडणूक आयोगाने काही नियम जारी केले आहेत. प्रशासक नेमण्यासाठीचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना यापुढे कुठल्याही प्रकारची सभा किंवा बैठक घेता येणार नाही, असे आदेश महापालिका प्रशासनाकडून नुकतेच जारी करण्यात आले आहे.
यापूर्वी जिल्हा परिषद असो किंवा महापालिका, यांची मुदत संपल्यानंतर तेथे कार्यरत आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचीच महापालिकेचा प्रशासक म्हणून नियुक्ती होत होती. महापालिका सभागृहाची मुदत संपतानाच हा एक कळीचा मुद्दा उपस्थित होतो. मुदत संपल्यावर महापालिकेवर प्रशासक म्हणून कोणाची नियुक्ती होणार? याकडे सर्वांच लक्ष आहे. नगर महापालिकेबाबत मात्र वेगळा प्रश्न उपस्थित केला जातो, त्याला कारण जसे राजकीय आहे, तसे ते प्रशासकीयही आहे.