नाशिक: अभिनेते धर्मेंद्र यांनी आपल्या मातोश्री सत्यवती कौर यांच्या नावाने टोकडे (ता. मालेगाव) येथे बांधलेल्या शाळेतील कामकाजाच्या चौकशीअंती प्रशासक नेमणुकीचा प्रस्ताव शिक्षण संचालकांकडे सादर करण्यात आला आहे. अभिनेता धर्मेंद्र यांनी १९८३ मध्ये टोकडे येथे आपल्या मातोश्रीच्या नावाने शाळा बांधून दिली आहे. या शाळेचा कारभार विद्यासागर शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे चालविला जातो. या शाळेत भ्रष्टाचार व अनियमितता झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी अनेकदा केली होती. याबाबत चौकशी करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले होते.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी गणेश फुलसुंदर, उदय देवरे, सुधीर पगार यांनी शाळेची पाहणी केली होती. सीसीटीव्ही, तक्रारपेटी, सखी सावित्री समिती, प्रयोगशाळा ग्रंथालय, शालेय इमारतीची दुरावस्था, वीज संयोजन नसण, संगणक सुविधा नसल्याचे, तसेच शाळेतील शिक्षकांचे सेवापुस्तक मुख्याध्यापक सुनील परस यांन घरी ठेवल्याचे निदर्शनास आले होते. यापूर्वी शिक्षण उपसंचालकांनी शाळेतील सुभाष धाडीवाल व अजित लाटे यांची मान्यता रद्द केली आहे. शाळेबाबत वारंवार तक्रारी येत असल्याचे स्पष्ट करीत शाळेच्य कामकाजात त्रुटी दिसून आल्याने प्रशासक नेमण्याचा प्रस्ताव शिक्षण संचालक डॉ. भाऊसाहेब चव्हाण यांनी सादर केला आहे.