इगतपुरी : नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात भीषण अपघाताची घटना घडली आहे. कसारा घाटातील ब्रेकफेल पाँईट जवळ एका कंटेनरने सहा ते सात वाहनांना जोरदार धडक दिली आहे. या अपघातात १३ ते १४ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही घटना रविवार (दि. १४) दुपारच्या सुमारास घडली आहे.
याबाबत मिलाल्लेया माहितीनुसार, कसारा घाटातील ब्रेकफेल पाँईट जवळ एका कंटेनरने सहा ते सात गाड्यांना भीषण धडक दिली. या धडकेत चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अपघातात १३ ते १४ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर महामार्ग पोलीस रूट पेट्रोलिंग टीम व रुग्णवाहिका दाखल झाली आहे. दरम्यान, आज रविवार वीकेंडमुळे कसारा घाटात वाहनांची मोठी गर्दी झालेली दिसत आहे.