नाशिक : राज्यात अपघातांची मालिका सूरुच आहे. अशातच नाशिकमधुन एका भीषण अपघाताची घटना घडल्याचे समोर आले आहे. नाशिकच्या द्वारका उड्डाणपूलाजवळ भीषण अपघात झाला आहे. भरधाव पीकअपने लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की. या अपघातामध्ये ५ ते ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० ते १२ लोक गंभीर जखमी झाले आहेत.
भरधाव पीकअपने लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ५ ते ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० ते १२ लोक गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली आहे. तसेच लोकांची मदतीसाठी एकच धावाधाव सुरु झाली आहे. या अपघाताने हळहळ व्यक्त केली जात असून जखमींना रुग्णालयात नेण्याचे काम सूरु आहे.