No entry in Tuljabhavani temple : धाराशिव : तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी आता मंदिर प्रशासनाने नवा निर्णय घेतला आहे. तुळजाभवानी मंदिरात आता अंगप्रदर्शन करणारे वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. (No entry in Tuljabhavani temple)
तुळजाभवानी मंदिर संस्थानने मंदिर परिसरात याबाबतचे फलक लावले असून त्याची अंमलबजावणी तात्काळ सुरू केली आहे. भारतीय संस्कृतीचा हवाला देत मंदिर संस्थान हा निर्णय घेतला असून या निर्णयावर पुजारी आणि भाविक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. मात्र यावर या निर्णयामुळे भक्तांच्या भुवया उंचावल्या आहेत. (No entry in Tuljabhavani temple! The administration’s strange decision, a new condition for entering the temple!)
पारंपरीक कपडे घातले दर्शन घेता येणार, मंदिर प्रवेशासाठी नवी अट!
साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्णपीठ म्हणून ओळखले जाणाऱ्या तुळजाभवानीच्या मंदिरात आता पारंपारिक कपडे घालूनच प्रवेश मिळणार आहे. वेस्टर्न कपडे, अंग प्रदर्शन करणारे कपडे तसेच बरमुडा घालून भाविकांना प्रवेश करता येणार नाही. या निर्णयाचे फलक आता मंदिर संस्थानाने मंदिर आणि आवाराच्या परिसरात लावले आहेत. (No entry in Tuljabhavani temple) अचानक मंदिर संस्थांनाने घेतलेल्या या निर्णयाचे पुजारी स्वागत करत आहेत, तर भाविक मात्र यावर समिश्र प्रतिक्रिया देत आहेत.
तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्यातूनच नाही तर परराज्यातूनही भावी मोठ्या प्रमाणात येत असतात. (No entry in Tuljabhavani temple) मंदिर संस्थांनाने हा निर्णय घेतला आणि याची अंमलबजावणी तात्काळ सुरू केली मात्र, ही अंमलबजावणी करताना बालकांना यात सूट मिळावी, अशी मागणी भाविक करत आहेत, तर स्त्रीने दर्शनासाठी येताना संस्कृती जपलीच पाहिजे अशा प्रतिक्रिया महिलांकडून येत आहेत.
मंदिर संस्थानाने घेतलेल्या या निर्णयाला आतापर्यंत कोणी विरोध केला जरी नसला तरी निर्णयाची अंमलबजावणी करताना निर्माण होणाऱ्या त्रुटीवरून पुढील काळात वाद होण्याची चिन्ह आहेत. (No entry in Tuljabhavani temple) एवढा मोठा निर्णय घेतल्यानंतरही मंदिर अधिकारी मात्र माध्यमांसमोर बोलायला तयार नाहीत. दुसरीकडे अष्टविनायक गणपतीपैकी एक असलेल्या रांजणगावच्या मंदिरातही अंग प्रदर्शन करणारे आणि अशोभनिय वस्त्र घालून प्रवेश मिळणार नसल्याचं मंदिर प्रशासनाने सांगितलं आहे. (No entry in Tuljabhavani temple)
मंदिर प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे आता भक्तांमधून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या निर्णयातून नेमके काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न आता भक्तांना पडला आहे. (No entry in Tuljabhavani temple) नेमकी कोणती कपडे घालावित याबाबत मंदिर प्रशासनाने मार्गदर्शन करावे, असे मेसेज समाज माध्यमांवर फिरु लागले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
उस्मानाबाद येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध 68 पदांसाठी भरती सुरु