मुंबई : महाराष्ट्र पोलीस दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी वरिष्ठ पोलीस अधिकारी नवल बजाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदानंद दाते यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्र एटीएस प्रमुखाचं पद हे रिक्तच होतं. त्यामुळे एटीएस प्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर बुधवारी गृहविभागानं या पदावर नवल बजाज यांची नियुक्ती करण्याचे आदेश जारी केले होते.
नवल बजाज हे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत. 1995 च्या बॅचचे पोलीस अधिकारी नवल बजाज केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते. ते सीबीआयमध्ये सहसंचालक म्हणून कार्यरत होते आणि कोळसा घोटाळ्यासारख्या महत्त्वाच्या प्रकरणांच्या तपासात ते सहभागी होते. ते केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे संयुक्त संचालक होते. यापूर्वी बजाज केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महानिरीक्षक म्हणूनही ते कार्यरत होते. त्यांनी राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेत अतिरिक्त महासंचालक म्हणून काम देखील केलं आहे.
कोळसा घोटाळ्याची चौकशी
नवल बजाज सीबीआयमध्ये सहसंचालक होते तेव्हा त्यांनी कोळसा घोटाळ्याची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवण्यात आलं. बजाज हे दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. एटीएस ही पोलीस दलाची विशेष शाखा आहे. ज्यामुळे देशातील दहशतवादी कारवाया थांबतात. एटीएस अधिकारी प्रत्येक परिस्थितीत दहशतवादी हल्ल्यांचा मुकाबला करण्यात तज्ज्ञ असतात. सीबीआयमध्ये सहसंचालक म्हणून कोळसा घोटळ्याचा तपास नवल बजाज यांनी केला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा महाराष्ट्रात परत पाठवण्यात आले होते.