नाशिक: नाशिक महानगरपालिका (एनएमसी) आणि स्थानिक पोलिसांनी आज पहाटे काठे गल्ली परिसरातील एक अनधिकृत दर्गा पाडण्यासाठी संयुक्त कारवाई सुरू केली. मध्यरात्रीच्या सुमारास ही तोडफोड मोहीम सुरू झाली, मुस्लिम धार्मिक नेते आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. दर्गा हटवण्याचे काम सुरू होताच जमावाने पोलिसांवर दगडफेक केली, निदर्शकांच्या एका गटाची पोलिसांशी चकमक झाली, दगडफेक झाली आणि त्यात चार अधिकारी आणि ११ पोलिस कर्मचारी जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि काही निदर्शकांना ताब्यात घेतले.
वक्फ बोर्ड आणि उच्च न्यायालयात यासंदर्भात सुनवणी झाली. उच्च न्यायालयात दर्गा ट्रस्टला दर्गा बाबतीत काही पुरावे सादर करता आले नसल्याने १५ दिवसांपूर्वी मनपाने दर्गा ट्रस्टला नोटीस बजावली होती, ज्यामध्ये त्यांना अनधिकृत बांधकाम पाडण्यास सांगितले होते. ट्रस्टने त्याचे पालन केले नाही, तत्पूर्वी काल रात्री दर्ग्यातील धर्मगुरु आणि प्रशासनाने मिळून धार्मिक प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर पहाटे साडेपाच वाजता अनधिकृत बांधकामाच्या तोडकामाला सुरुवात झाली. ज्यामुळे आजची तोडफोड मोहीम राबवण्यात आली. या परिसरातील अनधिकृत दर्गा वर्षानुवर्षे वादाचा मुद्दा राहिला आहे, हिंदू संघटना दर्गा हटवण्याची मागणी करत होते.
सध्या दर्गा हटवण्याची मोहीम सुरू आहे, दर्ग्याच्या बांधकामाचा राडारोडा बुलझोडरच्या सहाय्याने हटवला जात आहे जवळपास ९०% अनधिकृत बांधकाम आधीच पाडण्यात आले आहे. परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या भागातील वाहतूक वळवण्यात आली आहे आणि पोलिसांनी नागरिकांना दुसऱ्या परिसरातून जाण्याचे आवाहन केले आहे. हा परिसर पूर्णपणे निर्मनुष्य करण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, हिंसाचाराच्या कोणत्याही घटनेची नोंद नाही. प्रशासनाने सांगितले आहे की. अनधिकृत दर्गा हटवण्याची मोहीम कायद्यानुसार पार पाडण्यात आली आहे आणि सार्वजनिक सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. पोलिसांनी आश्वासन दिले आहे की, पुढील कोणत्याही घटना टाळण्यासाठी ते परिसरात कडक बंदोबस्त ठेवतील.