Nashik News : नाशिक : अनेकदा आपल्या आवडत्या तरुण किंवा तरूणीशी विवाह करण्याला बहुतांश जण पसंती देतात. मग तेव्हा कोर्टात जाऊन लग्न करतात तर कुठंतरी मंदिरात जाऊन सात फेरे घेतात. पण आता प्रेमविवाह जरी करत असाल तरी आई-वडिलांची परवानगी गरजेची असणार आहे. याबाबतचा ठरावच नाशिकच्या एका ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील सायखेडा ग्रामपंचायतीने याबाबतचा ठराव केला आहे. त्यात त्यांनी आई-वडिलांच्या परवानगीशिवाय प्रेमविवाहाला मान्यता देऊ नये, असे म्हटले आहे. (Nashik News) अशाप्रकारे ठराव करणारी सायखेडा ग्रामपंचायत बहुदा राज्यातील पहिली ग्रामपंचायत असणार आहे. सायखेडा ग्रामपंचायतने केलेला ठराव राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. आई-वडिलांच्या परवानगीशिवाय प्रेमविवाहाला मान्यता देऊ नये यासंदर्भात कायदा करावे, अशी मागणी याद्वारे सरकारकडे केली जाणार आहे.
…म्हणून घेतला निर्णय
जेव्हा अनेक तरुण-तरूणी आई-वडिलांच्या परवानगीशिवाय प्रेमविवाह करतात, तेव्हा त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. (Nashik News) त्यामुळे प्रेमविवाहानंतर उद्भवणाऱ्या अडचणींमुळे आई-वडिलांची प्रेमविवाहाला संमती असणे आवश्यक आहे, असे या ठरावात म्हटले आहे.