Nashik News : नाशिक : बिबट्या आणि माणुस संघर्षाबाबत सतत चर्चा होत असते. माणसाने बिबट्यासोबतचे सहजीवन स्विकारले तर एकमेकांना त्रास होणार नाही, यासाठी लोकशिक्षण होण्याची गरज अभ्यासक व्यक्त करत असतानाच नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका बिबट्याने नागरिकावर हल्ला केला असून, या जीवघेण्या हल्ल्यात संबंधित व्यक्तीची कवटीच बाहेर आली आहे. वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडली असून, ही घटना सीसीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बिबट्या मागून धाव घेत राजू शेख यांच्यावर अंगावर झेप घेताना कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या परिसरात बिबट्या मुक्त संचार करताना दिसल्याने नागरिकांनी बिबट्याला तत्काळ जेरबंद करावे, अशी मागणी केली होती. त्याचदरम्यान, रविवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला. नाशिकरोड परिसरात आनंदनगर येथील वर्दळीच्या कदम लॉन्स परिसरातून जात असताना राजू शेख यांच्यावर बिबट्याने पाठीमागून हल्ला केला. प्रसंगावधान राखून रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी आरडाओरड केल्याने येथे गर्दी जमली. (Nashik News) बिबट्याच्या हल्ल्यात शेख यांची कवटी बाहेर आल्याने ते गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तत्काळ शेख यांना सुजाता बिर्ला रुग्णालयात दाखल केले. राजू शेख एका गॅस एजन्सीमध्ये काम करतात. बिबट्याच्या हल्ल्यात तो गंभीररित्या जखमी झाले असून, त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या वेळी त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. गेल्या आठवड्यापासून गुलमोहर बंगला, जय भवानी रोडवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे दिसत असल्याने नागरिक घाबरले आहेत. (Nashik News) त्यातच ही घटना घडल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली.
दरम्यान, शहरातील आनंदनगर भागात देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याने पादचाऱ्यावर हल्ला केल्याची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या बिबट्याचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला जात होता. (Nashik News) तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना देखील सूचना दिल्या. गेल्या आठवड्यात नाशिकरोड परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार आढळून आला. या बिबट्याला वनविभागाने तत्काळ जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिक करत आहेत.
या पार्श्वभूमीवर माणूस आणि बिबट्या संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Nashik News : नाशिकच्या सप्तश्रृंगी घाटात बस दरीत कोसळली; एकाचा मृत्यू; २२ जण जखमी; उपचार सुरू
Nashik News : अजित पवार गटाकडून नाशिकमधील राष्ट्रवादी कार्यालयाचा ताबा; वातावरण तापले