Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. आज मतमोजणी सुरु आहेत. सध्या समोर येत असलेल्या कलांनुसार, भाजप आणि महायुती ही आघाडीवर आहे. दरम्यान, राज्यासह देशाचे लक्ष लागून राहीलेल्या अतिशय महत्वाच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे. देवेंद्र फडणवीसांनी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला आहे.
नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली सुरुवातीपासून आघाडी कायम ठेवली आहे. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. देवेंद्र फडणवीस हे आता दक्षिण पश्चिम मतदारसंघामधून विजयी झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना 35,755 मत पडली आहेत. तर त्यांच्यासमोर असणाऱ्या कॉंग्रेस उमेदवार प्रफुल्ल विनोदराव गुडधे यांना 23, 426 मतं पडली आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा तब्बल 12 हजारांहून अधिक मतांनी विजय झाला आहे.
महायुती सरकारने राबवलेली लाडकी बहीण योजनेचा या निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचं दिसून येत आहे. नागपूर दक्षिण-पश्चिम येथून देवेंद्र फडणवीस यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला आहे. तर, भाजपने एकट्याने 130 जागांवर आघाडी घेतली आहे. हा विजय अत्यंत मोठा मानला जात आहे.