Nagar News : कोतवाली, (नगर) : कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्यापाऱ्यांनी तसेच नागरिकांनी बाजारपेठेतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे. वाहतूक नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी व्यावसायिकांची बैठक बोलावून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच बाजारातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काही सूचना केल्या. (Police Inspector Yadav of Kotwali Police Station held a meeting of traders to know the problems of traders and citizens; Everyone is requested to follow the rules and cooperate with the police.)
सर्वांनीच नियम पाळून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन..
कापड बाजार, मोची गल्ली, जुना कापड बाजार, घास गल्ली, माणिक चौक या भागातील व्यापाऱ्यांची बैठक कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी बोलावली होती. (Nagar News) बाजारात दररोज नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी असते. खरेदीसाठी येत असलेल्या नागरिकांची वाहने शिस्तीत लावण्यात येत नसल्याने काही वेळा वाहतूक कोंडी होते.
अस्ताव्यस्त उभी केलेली वाहने लहान तसेच मोठ्या व्यापाऱ्यांनी अस्ताव्यस्त लावलेले दुकानाचे साहित्य, दुकानांसमोर ठेवलेल्या लोखंडी जाळ्या यामुळे बाजारपेठेत आलेल्या नागरिकांना दुकानांसमोर त्यांची वाहने पार्क करण्यासाठी जागा कमी पडते. परिणामी नागरिकांकडून वाहने रस्त्यावरच उभी केली जातात.(Nagar News) त्यामुळे बाजारपेठेत वाहतूक कोंडी निर्माण होते. बाजारपेठेत वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी नागरिकांनी आपली वाहने दोरीच्या आत तसेच इमारत कंपनीच्या पार्किंगच्या जागी पार्क करावीत.
व्यावसायिकांनी दुकानांसमोर लावलेल्या लोखंडी जाळ्यांचा आकार कमी करावा, लहान तसेच मोठ्या व्यापाऱ्यांनी साहित्य अस्ताव्यस्त लावू नये तसेच आपली आणि कामगारांची वाहने कापड बाजारात न आणता येणाऱ्या ग्राहकांना पार्किंग साठी जागा उपलब्ध करून द्यावी आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रशेखर यादव यांनी यावेळी केले. (Nagar News) बैठकीला ललित गुंदेचा, ईश्वर बोरा, कुणाल नारंग, योगेश पवार, समीर बोरा, प्रकाश लोळगे, अमित नवलानी, केतन मुथा, विजय गुगळे, योगेश मिरांडे, आकाश लोणकर आदी व्यावसायिक उपस्थित होते.
व्यावसायिकांमध्ये कोणता वाद असल्यास आपसात तंटा करून वाद वाढविण्याऐवजी कोतवाली पोलिसांना माहिती द्या. चर्चा करून निश्चित मार्ग निघेल, असे मत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी बैठकीत मांडले. (Nagar News) तसेच, व्यावसायिकांना दारू पिऊन त्रास देणे, दमदाटी करून कोणी वर्गणी मागत असल्यास त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे यादव यांनी सांगितले.
पार्किंगसाठी नागरिकांना जागा उपलब्ध करून द्या..!
कोतवाली पोलिसांनी बाजारपेठेत रस्त्याच्या दुतर्फा दोरी बसविल्यामुळे वाहतूक कोंडी नियंत्रित झाली, त्यावर व्यावसायिकांनी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर समाधान व्यक्त केले. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना वाहने पार्क करण्यासाठी व्यापाऱ्यांनी जास्तीत जास्त उपलब्ध करून द्यावी. (Nagar News)
त्यासाठी कामावर असलेल्या कामगारांची वाहने दुकानासमोर न लावता इतर ठिकाणी लावणे तसेच जाळ्यांचा आकार कमी करणे, या उपायोजना व्यापाऱ्यांनी कराव्यात अशा सूचना यादव यांनी केल्या.
बाजारात पोलिसांची नेमणूक..!
सकाळपासून रात्रीपर्यंत वाहतूक नियंत्रण करण्यासाठी कोतवाली पोलिसांची नेमणूक बाजारपेठेत करण्यात येत आहे त्यामुळे वाहतूक सुरळीत राहत असून पोलिसांचा वावर ही बाजारपेठेत वाढलेला असल्यामुळे व्यापारी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. गर्दीच्या वेळी दुचाकीच्या २ रांगा लावून पोलिसांकडून नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना सहकार्य केले जाते. (Nagar News) इतर विभागातील व्यापाऱ्यांचीही मीटिंग घेणार असल्याचे यावेळी पोलीस निरीक्षक यादव यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Nagar News : मित्रांनीच दिली मित्राची सुपारी; तीन अल्पवयीन मुले ताब्यात, दोघेजण फरार