Mumbai | मुंबई : एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची पुन्हा एकदा मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. ते लवकरच मुंबई पोलीस दलात रुजू होणार आहेत.
अँटिलिया-मनसुख हिरेन प्रकरणानंतर त्यांची बदली गोंदिया येथे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकामध्ये (Anti Terrorism Squad) सन २०२१ मध्ये करण्यात आली होती. ही बदली प्रशासकीय असल्याचे कारण सांगण्यात आले होते.
दया नायक एटीएसमध्ये होते कार्यरत….
मात्र, बदलीच्या या आदेशाला नायक यांनी मॅटमध्ये आव्हान दिले होते. मॅटने या बदलीच्या आदेशाला स्थगिती दिली होती. त्यानंतर दया नायक एटीएसमध्ये कार्यरत होते.
दया नायक कोण आहेत?
पोलीस निरीक्षक दया नायक यांची ओळख एक एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून आहे. दया नायक यांनी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.सन १९९५ मध्ये नायक यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती.
प्रदीप शर्मा यांच्यासोबत त्यांना गु्न्हे अन्वेषण शाखेत काम सुरू केले होते. दया नायक हे शर्मा यांच्या एन्काउंटर पथकात होते. दया नायक यांनी जवळपास ८० गुंडाचे एन्काउंटर केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune Police | पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह विजेत्यांचा पोलीस महासंचालक संजय कुमार यांच्या हस्ते गौरव