Mumbai News : मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ऑनलाईन गेमिंगची जाहीरात करतो आणि याच मुद्द्यावरुन प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेत सचिनच्या मुंबईतील घराबाहेर आंदोलन केले आहे. तसेच जर तुम्ही ऑनलाईन गेमिंगच्या जाहीराती करणार असाल तर भारतरत्न परत करण्याच्याही जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या. दरम्यान, पोलिसांनी बच्चू कडूंसह आंदोलन करणाऱ्या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
केली ‘ही’ मोठी मागणी
यावेळी आमदार बच्चू कडू म्हणाले की, ऑनलाईन गेमिंगची तुम्ही जर जाहीरात करताय, तर मग मटक्याचीही करा, ते कशाला सोडताय? भारतरत्न असल्यामुळे आम्ही आंदोलन करत आहे. ते फक्त क्रिकेटर असते तर आम्ही आंदोलन केलं नसतं. (Mumbai News) या देशात भगतसिंहांना भारतरत्न मिळाला नाही, अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला नाही, महात्मा फुलेंना मिळाला नाही. मग ज्यांना भारतरत्न मिळाला ते जर गैरफायदा घेत आहेत.
तुम्ही जाहीरातीतून बाहेर निघावं किंवा मग भारतरत्न परत करावा. हे जर झालं नाही, तर येणाऱ्या गणेशोत्सवात आम्ही प्रत्येक गणेशमंडळात दानपेटी ठेवणार आहोत. १० दिवस ही दानपेटी गणेशमंडळात ठेवणार. त्यानंतर त्या सर्व दानपेट्यांमधील रक्कम एकत्र करुन सचिन तेंडुलकरांना देणार” असेही आमदार कडू म्हणाले आहेत.
दरम्यान, ऑनलाईन गेमिंगच्या जाहीरातींमुळे भावी पिढीवर गंभीर परिणाम होत आहे. भारतरत्न असूनही अशा गोष्टीची जाहीरात करणं हे सचिन तेंडुलकर यांना शोभत नाही, (Mumbai News) असंही बच्चू कडू म्हणाले आहेत. आम्हाला क्रिकेटपटू म्हणून त्यांचा अभिमान आहे, पण भारतरत्न म्हणून जर ते अशा जाहीराती करत असतील तर ते मात्र मान्य नाही, असंही बच्चू कडू म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News :’जागर पदयात्रा संयमाने काढली हा इशारा, नाहीतर…’; अमित ठाकरे आक्रमक
Mumbai News : पुण्याच्या आनंदचा संघर्ष ऐकून KBC च्या सेटवर बच्चनही झाले भावुक…
Mumbai News : मंत्रालयात घुमणार शिवरायांच्या पराक्रमाचा पोवाडा; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय!