Mumbai News : मुंबई : आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये आज एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? यासंदर्भात एक सर्वेक्षण झाले, त्या सर्वेक्षणाची जाहिरात शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये करण्यात आली आहे. राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे असे या जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगामी निवडणुकीसंदर्भातील एक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे. या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो वापरला आहे. त्याशिवाय या जाहिरातीत कोणाचाही फोटो नाही. शिवसेनेकडून ही जाहिरात दिली असताना त्यात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो का नाही? असा खडा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. (This is not Balasaheb’s Shiv Sena; This is Modi’s ‘Corpse sena’; Sanjay Raut’s hit!)
स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार म्हणणाऱ्यांनी मोदींचा फोटो जाहिरातीत दिला आहे. मात्र, बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोला या जाहिरातीत स्थान नाही. कोट्यवधींच्या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरेंचा नामोल्लेखही नाही. (Mumbai News) मग ही शिवसेना कोणाची? शिंदेंची सेना ही मोदींची सेना आहे. अमित शहा यांची सेना आहे. यामुळे त्यांचा खरा मुखवटा उघड झाला. ही तर मोदी यांची ‘शवसेना’आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
एकनाथ शिंदे आनंदाच्या क्षणी बाळासाहेबांना विसरलेच कसे?
एकनाथ शिंदे आनंदाच्या क्षणी बाळासाहेबांना विसरलेच कसे? असा प्रश्न विचारत संजय राऊत म्हणाले की, या जाहिरातीचा खर्च कोणी केला. हा पैसा सरकारच्या तिजोरीतून झाला, की त्या दोन हजारांच्या नोटा बाहेर आल्या आहेत, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. हा सर्वे खरा आहे की, खोटा यामध्ये आम्हाला पडायचे नाही; पण हे सर्वेक्षण कुठे झाले, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात झाले की गुजरातमध्ये झाले, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे, (Mumbai News) असा दावा करणारी ही जाहिरात आहे. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांना २६.१ टक्के जनतेने पसंती दिली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांना २३.२ टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिली आहे. म्हणजेच, राज्यातील ४९.३ टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली असल्याचा दावा जाहिरातीत केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : वारीवर हल्ला हे कोणत्या मानसिकतेचे द्योतक? प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल!