Mumbai News : मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहे. त्यातील एक म्हणजे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाचा उद्देश सरकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे हा आहे. बर्याचदा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेकदा नागरिकांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.
मंत्रालयीन बैठकीत रेशन वाटपाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
आता रेशनसाठी दुकानाबाहेर रांगा लावण्याची गरज नाही. नुकत्याच झालेल्या मंत्रालयीन बैठकीत रेशन वाटपाबाबत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.(Mumbai News) नव्या निर्णयानुसार आता पात्र लाभधारकांना फिरत्या शिधावाटप वाहनाच्या माध्यमातून धान्य वितरण करण्यात येणार आहे. ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या धर्तीवर राज्यात लवकरच ‘रेशन आपल्या दारी’ उपक्रम सुरु होणार आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.
याबाबत मंत्रालयीन बैठकीमध्ये अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता रेशन दुकानात जाण्याची गरज लागणार नाही, (Mumbai News) तर फिरत्या शिधावाटप वाहनाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरण करण्यात येणार आहे. मुंबई-ठाण्यात मोबाईल व्हॅनमार्फत शिधा वाटप करण्यात येणार आहे. या योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आदेश मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. दरम्यान, जे पात्र लाभार्थी आहेत, त्यापैकी कोणालाही अन्नधान्यापासून वंचित ठेवू नका, असे आदेश चव्हाण यांनी शिधावाटप अधिकाऱ्यांना दिले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : ठाकरे गटाचा आणखी एक शिलेदार शिंदे गटात दाखल; आज पक्षप्रवेश…!