Mumbai News : मुंबई : ज्येष्ठ सिने-निर्माते कुलजीत पाल ( वय-९०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर २५ जून रोजी दुपारी १२ वाजता सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर हिंदी सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.
अनेक बॉलीवूड कलाकारांनी केला शोक व्यक्त
कुलजीत यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. गेल्या काही दिवसांपासून ते प्रदीर्घ आजाराने त्रस्त होते. अखेर २४ जून २०२३ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. २५ जून २०२३ रोजी कुलजीत पाल यांच्या पार्थिवावर मुंबईतील सांताक्रूझ स्मशानभूमीत दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.(Mumbai News) तर २९ जून २०२३ रोजी संध्याकाळी ५ ते ६ दरम्यान शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक बॉलीवूड कलाकारांनी त्यांच्या जाण्यावर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
कुलजीत पाल यांनी ‘अर्थ’, ‘आज’, ‘परमात्मा’, ‘वासना’, ‘दो शिकारी’ आणि ‘आशियाना’ सारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना कुलजीत पाल यांनीच सिनेमात पहिला ब्रेक दिला होता. (Mumbai News) पण काही कारणाने हा सिनेमा प्रदर्शित झाला नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : मुंबई, पुणे बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या