Mumbai News : मुंबई : जिथं कोणतंही वाहन पोहोचत नाही तिथं तोट्यात असतानाही पोहोचणारी एसटी, नेहमीच प्रवाशांसाठी अधिकाधिक सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असते. गेल्या दिवाळीमध्ये परिवहनकडून 30 रुपयांमध्ये चहा-नाश्ता ही योजना सुरू केली होती. या योजनेत एसटी हायवेवरच्या ज्या हॉटेलवर थांबणार त्या हॉटेलला 30 रुपयांमध्ये चहा-नाश्ता देणे बंधनकारक करण्यात आले होते. या योजनेला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. मात्र, काही ठिकाणी याचे पालन होत नसल्याच्या तक्रारी समोर आल्याने महामंडळाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. (Action for not getting breakfast for Rs 30 at official stop of ST)
एसटी महामंडळाचे आदेश
अधिकृत बस थांब्यावर 30 रुपयात चहा-नाश्ता न दिल्यास हॉटले चालक आणि अधिकृत बस थांब्यावर बस न थांबवल्यास चालक-वाहकावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश एसटी महामंडळाने काढले आहेत. त्याशिवाय महामंडळाचे उत्पादन असलेले ‘नाथजल देखील छापील किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने खासगी थांब्यावर खासगी हॉटेल चालकांना 30 रुपयांमध्ये चहा आणि नाश्ता देणे बंधनकारक केले आहे. (Mumbai News) त्यानुसार, संबंधित खासगी हॉटेल चालक याची अंमलबजावणी करतात की नाही याची खातरजमा करण्याची सूचना मार्गतपासणी पथक, वाणिज्य आस्थापन आदी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी करण्याची सूचना करण्यात आली आहे.
राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसेस करीता मंजूर केलेल्या खाजगी थांब्यांवर हॉटेल मालकाने 30 रुपयांमध्ये चहा आणि नाश्ता देणे उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. तरीही काही हॉटेल चालक या आदेशाचे पालन करीत नाहीत अशा तक्रारी समाजमाध्यमावर आल्या आहेत. (Mumbai News) तसेच नाथजल हे बाटली बंद पाणी देखील कुलींग चार्जच्या नावाखाली छापिल दरापेक्षा अधिक दराने विकले जात असल्याच्या तक्रारी समाजमाध्यमावर येत आहेत.
एसटीच्या थांब्यांवरील उपाहारगृहात अनेकदा जादा रक्कम आकारून खाद्यपदार्थांची विक्री केली जाते, अशा प्रकारचे आरोप मोठ्या प्रमाणावर केले जातात. अशा स्वरूपाच्या तक्रारी प्रवाशांकडून वारंवार होत आहेत.(Mumbai News) त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महामंडळाने नवीन तोडगा काढला आहे. त्यामुळे एसटीच्या अधिकृत थांब्याऐवजी अन्य हॉटेल, रेस्तराँमध्ये बस उभ्या करण्याच्या वृत्तीस आळा बसण्याप्र्रमाणेच अधिकृत थांब्यावरील पदार्थांचा दर्जा सुधारण्यास मदत होईल, असा होरा आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : यापुढे बालवाडी, नर्सरी सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागणार