Mumbai News : मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी विषारी जातीचा कोब्रा साप आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मातोश्री बंगल्यात असणाऱ्या पाण्याच्या टाकीमागे हा साप लपला होता. रविवारी सायंकाळी हा ४ फूटाचा कोब्रा कर्मचाऱ्यांना दिसला. या प्रकाराची माहिती रेस्क्यू टीमला कळवल्यानंतर ते बंगल्यात पोहचले. सर्पमित्रांनी या सापाला पकडून जंगलात सोडले आहे.
सर्पमित्रांनी या सापाला पकडून जंगलात सोडले
दरम्यान, साप शिरल्याचे कळताच उद्धव ठाकरे घराबाहेर आले. सापाला रेस्क्यू केले जात होते तेव्हा मातोश्रीवरील स्टाफ आणि उद्धव ठाकरे उपस्थित होते. (Mumbai News) तेजस ठाकरेही सापाला पकडताना पाहत होते. कोब्रा हा विषारी जातीचा साप असून, त्याला पाहताच अनेकांना घाम फुटतो. हा कोब्रा जवळपास ४ फूट लांबीचा होता. या सापाच्या चाव्याने माणसाचा जीव जातो.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घरी साप शिरल्याची घटना नुकतीच घडली होती. राऊत यांच्या भांडूपमधील घरात अचानक साप शिरल्याने सर्वांचीच धावपळ झाली. (Mumbai News) पत्रकार परिषद सुरू असतानाच खुर्चीच्या जवळच दीवड प्रकारचा बिनविषारी साप आढळला. त्यामुळे लवकरच पत्रकार परिषद आटोपण्यात आली.
त्यानंतर काही दिवसांतच मातोश्री बंगल्यात साप शिरल्याची घटना घडली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल