Mumbai News : मुंबई : काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे घाटकोपर येथील चित्तरंजन नगर राजेवडी कॉलनी येथील एका घराचा काही भाग कोसळला असून ढीगाऱ्याखाली दोघे नागरिक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. एनडीआरएफच्या तुकडीने बचाव कार्य राबवण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक नागरिक देखील मदत कार्यात सहभागी झाले आहेत.
ढिगा-याखाली दोन नागरिक अडकले
पावसाळा सुरू झाला की अपघात, दुर्घटना घडण्याचे प्रकार होतात. घाटकोपर येथील चित्तरंजन नगर राजेवडी कॉलनी येथे पावसामुळे घरचा तळमजला आणि तिसऱ्या मजल्यावरील भाग कोसळला आहे. (Mumbai News) ढिगारा उपासण्याचे काम सुरू आहे. महानगर पालिकेचे अधिकारी तसेच एनडीआरएफचे जवान घटनास्थळी पोहचले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेतकोणतीही जीवितहानी झाली नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : मुंबई, पुणे बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या