Mumbai Azad Maidan मुंबई : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ६१ मध्ये सुधारणा करून कर्मचाऱ्यांना लाभ होईल असा निर्णय तात्काळ घेण्यात यावा. चतुर्थ वर्गाची वेतनश्रेणी लागू करावी, यासह आदी मागण्यांसाठी राज्यातील ग्रामपंचायत संघटना कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुंबई येथील आझाद मैदानावर Mumbai Azad Maidan गुरुवारी (ता. २०) धरणे आंदोलन केले.
राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद…!
शासनास वेळोवेळी निवेदन दिले असून त्याकडे मात्र दुर्लक्ष लक्ष केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मंजूर होण्यासाठी राज्यातील सर्व कर्मचारी मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी आंदोलनासाठी जमले होते. गुरुवारी राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवण्यात येणार असल्याचे सदर निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक खेडेगावामध्ये गावच्या पाणीपुरवठ्याचे काम, गावच्या आरोग्य विभागाचे काम, स्वच्छतेचे काम, करवसुलीचे काम, कार्यालयीन कामकाज, अत्यावश्यक सेवा ई. स्वरुपाची कामे करणारा ग्रामपंचायत कर्मचारी आहेत.
महाराष्ट्र राज्यामध्ये या कर्मचाऱ्यांची संख्या शासनाने ठरवून दिलेल्या आकृती बंधातील व आकृती बंधाच्या बाहेरील असे एक लाख चाळीस हजार स्त्री-पुरुष कर्मचारी अनेक वर्षापासून सातत्याने व नियमितपणे काम करणारे उपेक्षित व गरीब कुटुंबातील कर्मचारी असून त्यांच्या प्रलंबित मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा. असे निवेदनात नमूद केले आहे.