पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता जमा व्हायला सुरूवात झाली आहे. त्यानुसार महिलांच्या खात्यात पैसे आले आहे. दिवाळीनिमित्त सरकारकडून भाऊबीज दिली जाणार आहे. त्यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे पैसे एकत्र जमा केले जात आहे.
सध्या सणासुदीचे दिवस आहेत. नवरात्रोत्सवानंतर लगेच दसरा आणि दिवाळी आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देण्याचा निर्णय सरकार घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर या योजनेत महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता जमा व्हायला सुरूवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यात काही महिलांच्या खात्यात 4500 तर काही महिलांच्या 1500 रूपये जमा झाले आहेत. त्यानंतर आता लगेचच महिलांना चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.म्हणजेच ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.
दरम्यान ज्या महिलांच्या खात्यात अद्याप चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे पैसे खात्यात आले देखील आहेत. त्यामुळे ज्या महिलांचे पैसे आले नाहीयेत त्या महिलांच्या खात्यात 10 ऑक्टोबरआधी पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना येत्या काही दिवसात आपलं बँक पासबूक आणि बँक खातं चेक करावं.
ज्या महिलांनी या योजनेसाठी यापूर्वी अर्ज केले आहेत, मात्र त्यांचा अर्ज काही तांत्रिक अडचणींमळं अद्याप पात्र ठरला नाही. त्यांनी त्यांच्या अर्जामधील त्रुटी दूर केल्यानंतर त्यांना देखील या योजनेचे पैसे दिले जाणार आहेत. काही महिलांचे अर्ज योग्य असले तरी त्यांचे बॅंक खाते आधार कार्डासोबत जोडलेले नसल्यानं त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नव्हता. त्यामुळं त्या महिलांनी त्यांचे बॅंक खाते त्यांच्या आधार कार्डासोबत जोडल्यावर त्यांना या योजनेचे पैसे मिळतील.
आतापर्यंत तीन हप्त्यांचे पैसे झाले जमा…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना जुलै महिन्यापासून देण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्यात पात्र महिलांना जुलै महिन्याचे पैसे देण्यात आले होते. कागदपत्रांची त्रुटी किंवा अन्य कारणामुळे पैसे न मिळालेल्या महिलांना या दोन्ही महिन्याचे 3000 रुपये सप्टेंबर महिन्यात देण्यात आले होते. म्हणजेच महिलांना आतापर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे मिळालेले आहेत. आता ऑक्टोबर महिन्यात आगामी दोन हप्यांचे पैसे दिले जातील.