पुणे : राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेला महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 1 कोटी महिलांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. आतापर्यंत लाखो महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत. नुकतेच सरकारने या योजनेच्या नियमात काही महत्त्वाचे बदल केले आहेत. यातील एका प्रमुख बदलाचा राज्यातील लाखो महिलांना फायदा होणार आहे.
अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. दोन महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. तसेच ज्या महिलांना आतापर्यंत 3000 रुपये मिळालेले नाहीत, त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये दिले जाणार आहे.
सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. अगोदरच्या अटींप्रमाणे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तत पणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, त्या कुटुंबातील महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते. म्हणजेच पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या कुटुंबातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नव्हता.
आता मात्र सरकारने ही अटच काढून टाकली आहे. त्यामुळे आता पाच एकरपेक्षा अधिक शेतजमीन असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेसाठी पात्र ठरवले जाणार आहे. पण सरकारने अडीच लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा कायम ठेवलेली आहे. दरम्यान, सरकारने पाच एकर शेतजमिनीची अट काढून टाकल्यामुळे राज्यातील लाखो महिलांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. पहिला आणि दुसरा हप्ता असे 3 हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे.