पुणे : राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 लेखी परीक्षेचा निकाल आज आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 20, 21 व 22 जानेवारी 2024 दिवशी घेण्यात आली होती. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 चा निकाल आज (16 जुलै) जाहीर करण्यात आला आहे.
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.https://t.co/y3IuhXgyyK pic.twitter.com/yBCcpio0al
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) July 16, 2024
मुख्य परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र झाले आहेत. एमपीएससी ची राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 दिलेल्या विद्यार्थ्यांना mpsc.gov.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या निकालानुसार मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुलाखतीच्या टप्प्यावर आयोगाकडून करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने उमेदवारांना वैद्यकीय चाचणीची तारीख व ठिकाण आयोगाकडून स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार आहे.
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 चा निकाल कसा पहाल…
प्रथम अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in ला भेट द्या.
– आता होमपेजवर डाव्या बाजूला ‘Adv.No.121/2023 State Services Main Examination 2023- Result of Written Exam’ च्या लिंकवर क्लिक करा.
– पुढे पीडीएफ मध्ये निकाल म्हणजेच पात्र उमेदवारांची यादी दिसेल. त्यामध्ये तुमचं नाव शोधा
– MPSC ने 2024 साठी नवीन परीक्षा पॅटर्न जाहीर केला आहे. आयोगाने परीक्षेच्या पॅटर्नमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. ही लेखी परीक्षा 9 प्रश्नपत्रिकांची आणि 1750 गुणांची आहे. मुलाखतीचे 275 मार्क्स आहेत. एकूण 2025 गुणांची ही परीक्षा आहे.