पुणे: आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून आंदोलनाला मोठे यश आले आहे. राज्य लोकसेवा आयोगाची नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, (दि.25 ऑगस्ट 2024) रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमपीएससीने याबाबत अधिकृत ट्विट केले आहे.
मंगळवारपासून पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच आंदोलन सुरू आहे. आयबीपीएस आणि राज्य लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा या एकाच दिवशी होणार असल्याने विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आले. विविध राजकीय पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे मंगळवारी रात्रीपासून आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले होते. तसेच शरद पवार यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर आपण स्वतः घटनास्थळी जाऊन आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला होता.
आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल. @MahaDGIPR @CMOMaharashtra https://t.co/uLEWi1xBoE
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) August 22, 2024
पुण्यामधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करणा-या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केली असून नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमपीएससीने याबाबत अधिकृत ट्विट केले आहे.