पुणे : राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. 6 जून रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा आता 21 जुलै रोजी घेण्यात येणार आहे.
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- परीक्षेचा दिनांक व इतर मागासवर्ग आरक्षणासह अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
प्रस्तुत परीक्षा दि. 21 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) May 30, 2024
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वर्ग 1 आणि वर्ग 2 प्रवर्गातील एकूण 524 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. ज्या आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या कुणबी अशा नोंदी सापडल्या आहेत त्यांना ओबीसी प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षेच्या तारखेमध्येही बदल केला आहे.
या संबंधित निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.