पुणे : सध्या राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं सुद्धा चित्र आहे. दरम्यान, आज राज्यात हवामानाची स्थिती नेमकी काय असेल? याबाबतचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
‘या’ भागात जोरदार पाऊस
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई शहरासह उपनगरांमध्येही आज पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
राज्यातील ‘या’ जिल्ह्यात यलो अलर्ट
आज राज्यातील बहुंताश जिल्ह्यामध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
14 जून पर्यंत राज्यात अशी असेल पावसाची स्थिती
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 14 जून पर्यंत राज्यात दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. परंतू, या कालावधीत सोलापूर, कोल्हापूर, सातारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सांगली, अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, पंढरपूर या भागात मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. दरम्यान, सध्या राज्याच्या काही भागातच मान्सून सक्रिय झाला असून, हळूहळू मान्सून राज्याच्या विविध भागात सक्रिय होत आहे.