राजेंद्रकुमार गुंड
माढा – माढेश्वरी अर्बन डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी आमदार बबनदादा शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी अशोक लुणावत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
माढेश्वरी अर्बन डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. ही निवडणूक पक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.वैशाली साळवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे.
या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी आमदार बबनराव शिंदे व उपाध्यक्षपदी पदासाठी अशोक लुणावत यांचाच एकमेव अर्ज आल्याने, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. वैशाली साळवे यांनी अध्यक्षपदी आमदार बबनदादा शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी अशोक लुणावत यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
दरम्यान, माढेश्वरी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे व उपाध्यक्ष अशोक लुणावत यांचा सत्कार निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. वैशाली साळवे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बँकेचे संचालक तथा जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे,गोरख देशमुख,गणेश काशीद,राजेंद्र पाटील, अमित पाटील,विपुला लुणावत, डॉ.निशिगंधा कोल्हे,संजय खरात, दिगंबर माळी,अरविंद नाईकवाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे, सहव्यवस्थापक नंदकुमार दुड्डम, वरिष्ठ अधिकारी निलेश कुलकर्णी, शाखाधिकारी अमोल मारकड यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बँकेचे संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे बँकेची नेत्रदिपक प्रगती झाली आहे. विशेष बाब म्हणजे बँकेचा एनपीए ‘शून्य’ टक्के असून बँकेला सातत्याने ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे.
बँकेचा कारभार पारदर्शक व सभासदांच्या विश्वासास पात्र राहून सुरू असल्याने दरवर्षी नफा व ठेवीमध्ये वाढ झाली आहे. असे निवडीनंतर बोलताना माढेश्वरी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले आहे.