Manoj jarange : राज्यात मराठा आरक्षण हा मुद्दा पेटलेला आहे. त्यावरून आरोप प्रत्यारोप सुद्धा होताना दिसत आहे,. कालच छगन भुजबळ हे शरद पवार यांची भेट घेऊन आले. मराठा – ओबीसी आरक्षणाच्या बाबत त्यांची भूमिका आणि पुढाकार गरजेचा आहे. अशी त्यांची भावना होती. यावर आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ आणि शरद पवार या दोघांवरही टीका केली आहे. तसेच आमरण उपोषणावर आपण ठाम असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.
मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी 20 जुलैपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सरकारच्या समोर मोठं आव्हान असणार आहे. त्यातच महायुतीच्या आरक्षणाच्या बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकल्याने महायुती अडचणीत आली आहे. या प्रकरणाची कोंडी जर फुटली नाही तर पुन्हा महायुतीला विधानसभेतही फटका बसू शकतो असे म्हटले जात आहे.
छगन भुजबळ यांनी ओबीसी- मराठामध्ये तेढ निर्माण केली : मनोज जरांगे
ओबीसी-मराठामध्ये ते तेढ निर्माण करण्याचे काम छगन भुजबळ यांनी केले आहे. त्यांना आणखी तेढ निर्माण करायची आहे. म्हणून ते स्फोटक वातावरण यांसारखे शब्द मुद्दामहून वापरत आहेत. जेव्हा छगन भुजबळ गोड बोलतात आणि म्हणतात मला शांतता पाहिजे आणि ‘स्फोटक वातावरण’ असे शब्द वापरतात. त्यावेळेस मीडिया आणि नेत्यांसमोर सांगतात की राज्यातील वातावरण शांत झाले पाहीजे तेव्हाच ते नेहमी काहीतरी डाव टाकतात असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. भुजबळ यांचा डाव होता की भाजप आणि देवेंद्र फडवणीस संपले पाहिजे, शिंदे साहेबांपासून सर्व संपले पाहिजेत. यामुळे मधल्या काळात छगन भुजबळ खूप विरोधात बोलले. त्यांचेच खाल्ले आणि त्यांच्याच विरोधात बोलले. कालही शरद पवारांची भेट घेताना छगन भुजबळ यांनी डाव टाकला असावा अशी शंका असल्याची जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
भुजबळ जिथे जातात तिथे डाव घेऊनच जातात..
छगन भुजबळ जिथे जातात तिथे डाव घेऊनच जातात. त्यांना ओबीसीचं काही देणं घेणं नाही. छगन भुजबळ हे ओबीसी समाजासाठी कोणत्याही नेत्याला भेटत नाहीत. जर शरद पवार यांनी भेट दिली नसती तर बाहेर येऊन भुजबळ यांनी आरोप केला असता की, शरद पवार मराठ्यांचे विरोधक आहेत म्हणून ते मला भेटले नाहीत. असे मनोज जरांगे पाटील म्हटले आहे.
शरद पवार नाही आले तर नाही आले जाऊ द्या..
शरद पवार यांना मराठ्यांच कधीच चांगलं व्हाव वाटत नाही. महाविकास आघाडीला मराठ्यांच कधीच चांगलं व्हावे असं वाटत नाही का ? मराठ्यांचं चांगलं व्हावं तशी तुमची विचारधारा आहे का..? शरद पवार नाही आले तर नाही आले जाऊ द्या त्यांना, त्यांच्या पाठाडात लाथ मारा. सत्ता, बहुमत तुमच्या बाजूने आहे. मग तुम्हालाच आरक्षण द्यायचे नाही, एकमेकांवर ढकलायची ही सवय तुम्हाला पहिल्यापासून आहे. असेही मनोज जरांगे यांनी म्हटले.