छत्रपती संभाजीनगर : जेवण वाढण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीला चापट मारली. त्यानंतर झालेल्या वादातून पत्नी आणि मुलाने वरवंटा डोक्यात मारून पतीचे डोके फोडले. ही घटना २० ऑगस्ट रोजी रात्री दीडच्या सुमारास भारत नगर, गारखेडा भागात घडली. गंगा बाबासाहेब साबळे आणि मुलगा यशराज अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बाबासाहेब भगवान साबळे (४५, रा. भारत नगर) यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.