बीड : शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पुतण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सचिन मेटे असं गळफास घेतलेल्या तरुणाचं नाव असून तो 34 वर्षाचा होता. विनायक मेटे यांचे भाऊ त्रिंबक मेटे यांचा तो मुलगा आहे. त्याने आत्महत्या नेमकी का केली? याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला आहे. पोलीस आता पुढील तपास करत आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली असून मेटे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.