छत्रपती संभाजीनगर : मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दीड लाखाची सभा पार पडली. ही सभा यशस्वी झाल्यामुळे चंद्रकांत खैरे यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहराचा विकास इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्यामुळे खुंटला. चंद्रकांत खैरे यांच्या गाडीत मी कधीही फिरायला तयार आहे. स्वतःला काम करता आलं नाही म्हणून मागच्या निवडणुकीत पराभव झाला. 20 वर्षांपासून शहराला पाण्याचा त्रास आहे. मी 140 किलोमीटर वरून गॅस लाईन आणली. चंद्रकांत खैरे 60 किलोमीटर वरून पाणी आणू शकले नाहीत अशी टीका केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी केली.