छत्रपती संभाजीनगर : शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरट्यांनी दोघांच्या दुचाकी चोरून नेल्या. एक दुचाकी रेल्वे स्टेशन परिसरातील जहागिरदार कॉलनीत तर दुसरी संतोषीमाता नगरात घडली आहे. मोहमंद अकबर मोहम्मद जलाल यांनी ६ एप्रिलला दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन मशिदच्या पाठीमागील जहागीरदार कॉलनीत त्यांची दुचाकी (एमएच २०, बीजे ५४७२) उभी केली होती. चोरट्याने ती दुचाकी अवघ्या वीस मिनिटात हॅन्डल लॉक तोडून लंपास केली. याप्रकरणी वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद हरिदास रिंगणे यांनी १२ मे रोजी घरासमोर त्यांची दुचाकी (एमएच २८, बीएक्स-१७५१) उभी केली होती. रात्रीतून चोराने दुचाकी हॅन्डल लॉक तोडून लांबविली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.