बीड: बीड मधून धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात एका 25 वर्षीय तरुणाला दोन दिवस घरात डांबून ठेवत त्याला अमानुष मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. विकास बनसोडे असं मयत तरुणाचं नाव आहे. ही घटना आष्टी तालुक्यातील पिंपरी (घुमरी) गावात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुण ज्या व्यक्तीकडे कामाला होता, त्याच व्यक्तीने तरुणाला घरात डांबून मरहान केल्याचा प्रकार घडला आहे. याच मारहाणीत तरुणाचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलीसोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयातून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मयत बनसोडे मूळचा जालना जिल्ह्याचा रहिवासी आहे. मात्र, तो आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील क्षीरसागर यांच्या ट्रकवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. क्षीरसागर यांच्या अल्पवयीन मुलीशी प्रेम संबंध सुरू असल्याच्या संशयातून मुलीच्या घरच्यांनी तरुणाला दोन दिवस घरात डांबून ठेवले. त्याला केलेल्या अमानुष मारहाणीत तरुणाचा जागीच मृत्यू झाला.