फुलंब्री : तालुक्यातील वाघोळा येथे भर दिवसा अज्ञात चोरट्यानी जिन्यातून घरात प्रवेश सोन्याच्या दागिन्यासह एक लाख चाळीस हजार नगदी रक्कमेह असा एकूण तीन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शनिवार (दि.१५) रोजी घडली. वाघोळा येथील गणपत सर्जेराव गायकवाड यांचे गावात घर असून घरातील सर्व मंडळी शेताच्या कामासाठी सकृीली नऊ वाजता शेतात गेले असता चोरट्याने संधी साधून जिन्यातून घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले नगदी रोख रक्कम एक लाख चाळीस हजार, तसेच सोन्याचे गंठण, नेकलेस, वेल, झुंबर असा एकूण तीन लाख दहा हजार रुपयांचा ऐवज घरातून चोरून नेला.
गायकवाड कुटुंबीय संध्याकाळी सहा वाजता घरी आले असता घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यावरून त्यांनी सदर घटनेची माहिती फुलंब्री पोलिसांना दिली. पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन ठसे तज्ञांना पाचारण केले. यानंतर रविवारी (दि.१६) रात्री गणपत गायकवाड यांच्या फिर्यादीवरून फुलंब्री पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.